गाडगे बाबा तुमचा संत म्हणून उल्लेख करणे हि केवळ औपचारिकता आहे. आहेच कोण संत म्हणण्याच्या लायकीच तुमच्या शिवाय कोणा गैर ब्राह्मणांतील, ज्यांनी समाज स्वास्थ्य सुधारण्या साठी, त्याच्या सर्वांगीण ऐक्यासाठी, व त्यायोगे समाज उद्धारणा साठी व समाज सुधारण्याचा दृष्टीने समाजाच्या दुष्प्रवृत्तींवर घणाघाती प्रहार केलेत, जसे ब्राह्मणांतील संत ज्ञानेश्वर व एकनाथांनी केले होते? त्या दोघांनीच सर्व प्राणीमात्र देखील माणुसकी दाखवायच्या लायकीचे आहेत आणि अस्पृश्य व खालच्या समाज घटकांना, त्यांच्यातीलच पण ब्राह्मणांनी अंशतः अस्पृश्य न ठरवलेल्या, समाज घटकांमार्फत ब्राह्मणां कडून देण्यात येत असलेल्या अमानवी व प्राणी मात्रांनाही देण्यात येत नसेल अशा घृणास्पद प्रवृत्तीं विरुद्ध, सार्वत्रिक उठाव व्हावा असा स्पष्ट संदेश त्यांच्या कृती व वृत्तीने, तेव्हा एकजात हिंदू असलेल्या, सर्व हिंदुंना दिला होता. लक्ष्यात घ्या, तमाम गैर ब्राह्मण आणि भारतातील तथाकथित उच्चवर्णीय, जे मुळात अस्पृश्यां प्रमाणेच भारतातील मूलनिवासीच आहेत, त्यांना देखील ब्राह्मणांना स्पर्श करण्यास सक्त मनाई होती. ते ब्राह्मणांच्या पायांना स्पर्श करणे, त्यांचे चुंबन घेणे व ब्राह्मणांनी दया दृष्टी दाखविलीच तर त्यांच्या पदक्षालनाचे प्राशन करणे, इतपतच ब्राह्म्नांकडून कृपामंडित होते. महाराष्ट्रातील ब्राह्मणांकडून ठाम नकार आल्या नंतर राष्ट्रभूषण शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्यास दिल्लीहून आलेल्या ब्राह्मण गागा भटाने त्या गोब्राह्मण प्रतिपालक राजाचा राजतिलक देखील हाताने न लावता आपल्या पायाच्या अंगठ्याने लावला होता. अवध्य ठरवल्या गेलेल्या ब्राह्मणांतील मुसलमान धार्जिण्या ब्राह्मण भास्कर कुलकर्णी कुत्र्याची खांडोळी करण्यास मागे पुढे न पाहणाऱ्या स्वाभिमानी महाराजांच्या आयुष्यातील तो प्रसंग म्हणजे त्यांचाच नव्हे तर समस्त मराठ्यांचा घोर लज्जास्पद अपमान होता. दलित अत्याचार भूषणावह मानणाऱ्या मराठ्यांचे सोडा पण स्वताःस स्वाभिमानी म्हणविणाऱ्या मराठ्यांतील एक परंतु अलौकिक अशा शिवाजी महाराजांनी तो अपमान का सहन केला, हे माराठेत्तर महाराष्ट्रीयांना कोडेच रहाणार. त्या ग्यानबाने तर साधा रेडा देखील ब्राह्मणांच्या तोडीस तोड वेदशास्त्र पारंगत म्हणून ब्राह्मणांच्याच योग्यतेचा असू शकतो, असे रेड्याच्या तोंडून वेद म्हणवून घेवून दाखविले होते. पण आपल्या सगळ्या बावळट म्हणण्या पेक्षा, तेव्हा हि स्वल्प संखीय असलेल्या ब्राह्मणांहून संख्येने कैक पटीने जास्त असलेल्या गैर ब्राह्मणांच्या अख्ख्या गावांतील, ब्राह्मणांच्या फक्त एकाच कुटुंबाच्या देखील दहशती पुढे, थर थर कांपणाऱ्या त्या साऱ्या गैर ब्राह्मणांना, व त्यांच्यातील तथाकथित संतांना देखील, त्यांच्या मालक अशा ब्राह्मणांनि संत एकोबा व ग्यानोबांच्या त्या क्रांतिकारी घटनांकडे एक चमत्कार ह्याच दृष्टीने पहायला लावून व एकोबा आणि ग्यानबा ला देवस्वरूप देवून वेगळा विचार करायची संधीच मिळू दिली नाही. बिचाऱ्या एकट्या पडलेल्या त्या एकोबा आणि ग्यानबांना तरी त्यांचे ते क्रांतिकारी विचार, ब्राह्मणांच्या दहशतीला घाबरणे हे आपले जन्मो जन्मीच प्रारब्ध व परम कर्तव्यच आहे अशी खुणगाठ बांधलेल्या व बहु संख्येने असलेल्या त्या भोळ्या भाबड्या(?) गैर ब्राह्मणांना अधिक समझवायला जाणे, व त्यांचे ते क्रांतिकारी विचार पुढे रेटणे म्हणजे आपल्याच पायांवर धोंडा मारून घेण्यासारखेच वाटले असणार. गाडगे बाबा, संतांचे कर्तव्य असते, चांगल्याचा उदो उदो करून वाईटाची नांगी ठेचून समाजात स्वातंत्र्य, समता व बंधुत्व रुजवून त्याची पक्की एकजूट करून समाज व राष्ट्राचा उद्धार करणे. संत अलौकिक प्रतिभेचे नसले तरी इत्तरांपेक्षा वेगळा विचार करणारे, समाजोद्धारक असावेत असे अपेक्षित असते. आपले गैर ब्राह्मण असे सगळे संत चिपळ्या आणि टाळ कुटत ब्राह्मणांची व देवांची थोरवी गाणारी कवनं बनवून, वैकुंठाला जाण्याचा त्यांचा रस्ता देवांच्या व ब्राह्मणांच्या प्रशस्ती व कृपेने, प्रशस्त व सुलभ कसा होईल ह्याच विवंचनेत दिसलेत. गाडगेबाबा म्हणून तुम्ही सर्व गैर बामनातील अलौकिक संत आहात. तुम्ही भारतीयांतील, जे बहुसंख्येने हिंदू म्हणवतात, त्यांच्यावर हिंदू धर्मांतर्गत थोपण्यात आलेल्या सर्व अमानवी व दुष्ट चाली रिती, संस्कार, काहींच्या विकृत वासना शमविण्यासाठी काहींना देवदासी व मर्दा सारख्या पुरुष्याला वाघ्या मुरळी च्या प्रथे अंतर्गत हिजडे बनविणे, बळी देणे इ.इ. विरुद्ध प्रभावी जनजागृती केलीत. तुमच्या शिवाय गैर ब्राह्मणांतील असे संतपद महात्मा फुले, शाहूमहाराज, कर्मवीर शिंदे, भाऊराव पाटील ह्या अलीकडील सुधारकांना देखील बहाल होवू शकते. त्या एकोबा आणि ग्यानबा नंतर बामनांत न्या. रानडे, सुधारककार आगरकर, ना. गोपाळकृष्ण गोखले, सानेगुरुजी व सावरकर सुद्धा आपल्याच बामनांतील भयानक विकृतीविरोधात उभे ठाकले होते. काय दुर्दैवविलास आहे पहा. ह्या अलौकीकांना त्यांचीच माणस संपूर्ण विसरलेली दिसताहेत. ह्यांना कडवे हिंदू धर्म प्रसारक व ब्राह्मण्याचाच उदो उदो करणारे अतिप्रिय आहेत. हिंदू हा धर्म नसून आत्ता हि मूठभरच असलेल्या परदेशी ब्राह्मणांनी आयात केलेली अशी स्वताः ची जीवन पद्धती म्हणजे केवळ संस्कृतीच आहे, असे जगजाहीर असताही, येथील मूलनिवासी त्याकडे डोळेझाक करीत आहेत व ते अप्रिय सत्य ऐकूच येवू नये म्हणून त्यांना बंद करण्याची ऐच्छिक सोय नसलेल्या श्रवणेन्द्रीय म्हणजे कानांत बोळे ठुसताना दिसत आहेत. अर्थातच ग्यानोबा, एकोबांच्या क्रांती कडे दुर्लक्ष्य करायला लावणाऱ्यांच्या अमीट प्रभावाचाच हा परिणाम आहे हे वेगळे सांगायला नको. गाडगेबाबा, ब्राह्मणांच्या वाऱ्यालाही उभे न राहणारे असे तुम्ही, अस्पृश्य बाबासाहेबांना गळ्याला लावलेत. शाहूमहाराजांनी तर त्यांना पोटाशी धरले. कर्मवीर शिंदे व भाऊसाहेब पाटीलांनी हि त्यांच्याशी हात मिळवणी केली. महत्मा फुले असते तर त्यांच्या दत्तक घेतलेल्या ब्राह्मण पुत्र यशवंतास, अस्पृश्य बाबासाहेबांस नातू म्हणून दत्तक घ्यावयास हि लावले असते. फुलेंचे अद्याप फुल, स्वतःस मराठा भासवू इच्छुक लोक अस्पृशांच्या पद स्पर्शाने पावन हुतात्मा स्मारकास पवित्र म्हंटले गेलेल्या गोमुत्राने धुतल्या नंतर आत्ता खरी घाण साफ करण्याची अधिक प्राक्टिस होण्यासाठी तुरुंगात गेलेले दिसतात. पण तुमचे परीट देखील परीट शब्दाच्या नंतर मराठा शब्द लावण्यात धन्यता मानताना दिसलेला एक फलक मन उद्विग्न करतो. वेळ मिळाला तर वरून त्यांना कळवा कि आरक्षणा साठी मराठ्यांना जर आत्तापर्यंत त्यांनी हिणकस ठरवलेल्या कुणब्यांत हि सामील व्हावसं वाटत असेल, तर त्या परीटांना उच्च जातीय होण्याची त्यांची हाव पुरी करण्यासाठी, त्यांनी आरक्षणाचे लाभ सोडून, आत्ता मराठ्यांकडून खाली होणारे ब्राह्मणां खालोखालचे रिक्त स्थान घेण्यास काहीहि हरकत नाही. आम्ही माणुसकी व कृतज्ञता हा गुण बाळगणारे आहोत. तुम्हाला तुमच्या अलौकीकते साठी शतशः नमन.
#दि. २८/५/२०१७ च्या पत्रलेखिका सामंत यांच्या पत्राच्या अनुषंगाने स्फुरलेले विचार. मंगला ताई सामंत या नावा वरून ब्राह्मण वाटतात. तसेच असेल तर माझ्या सारख्या अस्पृशातील एक असा मी व समस्त अस्पृश्य वर्गास त्यांनी मांडलेले विचार काहीसे दिलासादायक आहेत. नजीकच्याच भूतकालीन पाश्च्यात्य प्रवाशांनी नोंदवून ठेवलेल्या मतांप्रमाणे सर्वच भारतिय ढोंगी व अप्रामाणिक आहेत या समजुतीस ते छेद देणारे देखील आहेत. अद्याप हि काही प्रामाणिकता व माणुसकी रा. स्व. संघाच्या ऐतिहासिक सिद्ध विकृत पेशवाईची पुनर्स्थापना करण्याच्या धेय्याने पछाडलेल्या ब्रह्मवृंदास वगळता, अन्य ब्राह्मणात शिल्लक आहे हे सामन्तां सारख्या एका ब्राह्मण भगिनी मुळे जाणवल्या नंतर, आद्य शंकराचार्योत्तर काळा पासून ब्रिटीश राज्यकर्त्यांच्या आगमना पर्यंत, सर्वरीत्या नागवल्या व पिडल्या गेलेल्या अस्पृश्य व आदिवासी समूहात, अस्पृश्य नेते बाबासाहेब आंबेडकरांच्या अवतीर्ण होण्या नंतर प्रगती सह जी विद्रोहाची हि लाट उसळली, व फक्त ब्राह्मणांनीच बोथट संवेदनाशील व कट्टर असहिष्णू अशा बनविलेल्या ब्राह्मणेत्तर बहुसंख्यांकांच्या बेताल वर्तनावर एक अक्सीर इलाज म्हणून...
Comments
Post a Comment