#दि. २८/५/२०१७ च्या पत्रलेखिका सामंत यांच्या पत्राच्या अनुषंगाने स्फुरलेले विचार. मंगला ताई सामंत या नावा वरून ब्राह्मण वाटतात. तसेच असेल तर माझ्या सारख्या अस्पृशातील एक असा मी व समस्त अस्पृश्य वर्गास त्यांनी मांडलेले विचार काहीसे दिलासादायक आहेत. नजीकच्याच भूतकालीन पाश्च्यात्य प्रवाशांनी नोंदवून ठेवलेल्या मतांप्रमाणे सर्वच भारतिय ढोंगी व अप्रामाणिक आहेत या समजुतीस ते छेद देणारे देखील आहेत. अद्याप हि काही प्रामाणिकता व माणुसकी रा. स्व. संघाच्या ऐतिहासिक सिद्ध विकृत पेशवाईची पुनर्स्थापना करण्याच्या धेय्याने पछाडलेल्या ब्रह्मवृंदास वगळता, अन्य ब्राह्मणात शिल्लक आहे हे सामन्तां सारख्या एका ब्राह्मण भगिनी मुळे जाणवल्या नंतर, आद्य शंकराचार्योत्तर काळा पासून ब्रिटीश राज्यकर्त्यांच्या आगमना पर्यंत, सर्वरीत्या नागवल्या व पिडल्या गेलेल्या अस्पृश्य व आदिवासी समूहात, अस्पृश्य नेते बाबासाहेब आंबेडकरांच्या अवतीर्ण होण्या नंतर प्रगती सह जी विद्रोहाची हि लाट उसळली, व फक्त ब्राह्मणांनीच बोथट संवेदनाशील व कट्टर असहिष्णू अशा बनविलेल्या ब्राह्मणेत्तर बहुसंख्यांकांच्या बेताल वर्तनावर एक अक्सीर इलाज म्हणून...
Comments
Post a Comment